सविस्तर वृत्त असे की, सकाळी सकाळी मॉर्निंगवाक करणारी सुमन तुकाराम काटे (कोष्टी) ही महिला गेल्या ४ ते ५ वर्षा पासून मॉर्निंगवाक सावदा - फैजपूर मार्गावर करीत असायची.[ads id="ads2"]
दिनांक ३१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्या मॉर्निंग वॉक करून घरी परतत असतांना नायरा पेट्रोल पंपा समोरच मॉर्निंगवाक करून घरी परतीच्या वेळी येत असताना भरधाव असलेल्या अज्ञात ट्रकने सुमन काटे (कै. तुकाराम देवराम काटे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या पत्नी होत्या) हिस जबर धडकी दिल्याने त्याच्या उजव्या पायास व हातास तसेच पोटात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी तिथे असलेल्या एलियसखान अय्युबखान या इसमाने रस्त्यावर जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास थांबवून जखमी अवस्थेत असलेल्या महिलेस मोटारसायकल द्वारे सावदा येथील व्ही. जे. वारके यांचे सुश्रुत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शव शवविच्छेदन साठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर भुसावळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


