📙साहित्यसम्राट - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष !.......

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती


 📙साहित्यसम्राट - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष !.......

 *📘संकलन पी.डी.पाटील सर*

[ महात्मा फुले हायस्कूल,धरणगाव. ]

               " ये आजादी झुटी है देश की जनता भुखी है I" अशी सिंहगर्जना करणारे व स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये लाखोंचा मोर्चा काढणारे, थोर समाजसेवक,लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज जन्मदिवस. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव हे निसर्गरम्य असलेलं गाव. याच गावी भाऊराव सिधोजी साठे आणि वालूबाई यांच्या पोटी १ ऑगस्ट १९२० रोजी पुत्र जन्माला आला. [ads id="ads1"] 

  पुत्राचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. त्याच वेळी फकीराने इंग्रजांचा खजिना लुटलेला होता. खजिन्याची लूट गावात वाटली जात होती. भाऊराव साठेच्या दारात उभा राहून फकीरानं आवाज दिला. तुकारामच्या जन्माची आनंद वार्ता फकीरास समजली. दोन ओंजळी सुरती रूपये अक्कांच्या ओंजळीत टाकून "बाळ व बाळंतीनीची काळजी घ्या." असं सांगून घोड्याला टाच मारली. भाऊराव व वालूबाई यांना पाच अपत्य होते. त्यातली चार वाचली. [ads id="ads2"] 

  तुकाराम, भागू, शंकर, जाई या सर्व भावंडात तुकाराम सर्वात मोठा म्हणून त्यास अण्णा म्हटले जाऊ लागले. तुकाराम बालपणापासून खोडकर व कुशाग्र बुद्धीमत्तेचा होता. भाऊराव साठे यांनी मुलास शाळेत दाखल केले. पहिल्याच दिवशी तुकारामास जातियतेचा अनुवभ आला. ब्राह्मणांची मुलं मराठ्यांच्या मुलांनासुद्धा स्पर्श करत नव्हती. १९ व्या शतकातील ग्रॅड डफ या इतिहासकाराने असा उल्लेख केला आहे की, महाराष्ट्रातील ब्राह्मणवर्ग मराठा समाजास जनावरांपेक्षा थोडी जास्त किंमत देतो. शाळेत ब्राह्मण मास्तर होते.शाळेत दुसऱ्याच दिवशी अक्षरे काढता येत नाहीत म्हणून मास्तरांनी अण्णाभाऊंचा हात जमिनीवर ठेवला व त्यावर छडीने बेदम मार दिला. 

  शिक्षेचा अमानुष प्रकार घडला. अण्णाभाऊंनी मास्तराचं डोकं फोडलं नी अण्णाभाऊंची शाळा सुटली ती कायमचीच. वाटेगावात ओला दुष्काळ पडला होता. भाऊराव साठेनी आपल्या लहान मुलाला घेऊन मुंबईची वाट धरली. त्यावेळी अण्णाभाऊंच वय होतं बारा वर्षांचं. डोक्यावर गाठोडे घेऊन ही मुलं पायी चालत होती. मैलाचं अंतर पायी चालून पूर्ण केले. ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे आल्यावर अण्णाभाऊंनी हमालीचं काम सुरू केलं. मुंबईत भायखळा वस्तीत आल्यावर मिळेल ते काम अण्णाभाऊ करू लागले. कापडमीलमध्ये काम करत असताना जगासाठी वस्त्र विणणाऱ्या कामगारांना स्वतःचेच अंग झाकायला कपडे का मिळत नाहीत ? हा प्रश्न त्यांना पडे. टोलेजंग इमारती बांधणात्यांना झोपडीत का रहावं लागतं? पृथ्वीवरील सर्व लेकरे देवाचीच असताना ही शिवाशिव कशी? प्राण्यांना देव मानले जाते पण माणसांचा स्पर्श का चालत नाही, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. इ.स. १९३४ च्या दरम्यान रशियन राज्यक्रांतीचा इतिहास काँग्रेड लेनिनचे चरित्र ही पुस्तके मिळवून अण्णाभाऊंनी वाचून काढली. यातील महान विचारांचा प्रभाव त्यांच्या अंत:करणावर पडला. अण्णाभाऊ पेटी, तबला, ढोलकी, बुलबुलतरंग, सारंगी अशी सर्वच वाद्य वाजवण्यात तरबेज होते. तलवारबाजी, कुल्हाड, दांडपट्टा ही हत्यारे ते कौशल्याने चालवत. क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांचं स्फुर्तीदायी भाषण ऐकूण अण्णाभाऊंनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती.

              मुंबईतील कामगार वर्गाच्या संपर्कामुळे वयच्या पंधरा-सोळा वर्षापासूनच अण्णाभाऊ कामगार चळवळीत सहभागी झाले. कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान वाचून ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. इ.स. १९३५ ला अण्णाभाऊंनी साहित्य निर्मितीला सुरुवात केली. अण्णाभाऊंना चित्रपटाचं विशेष आकर्षण होतं. चित्रपट सुरू झाला की, कलाकारांची नावे येत असत तो मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत असायची. शेजारील माणसे ती मोठ्याने वाचायची. त्याच पाटा नावे पाहून अण्णाभाऊ गुजराती शिकले. इ.स. १९३० ला त्यांनी स्टेलिनग्राडचा पोवाडा लिहिला. १९३८ला भाऊरावांचे निधन झाल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी अण्णाभाऊंवर आली. इ.स. १९३९ मध्ये अण्णाभाऊ गावाकडे आले. तेथे कोडाबाई सोबत त्यांचा सं झाला. बापू साठे यांच्यासोबत ते तमाशात काम करू लागले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनातही अनी सहभाग घेतला. इ.स. १९४३ ला त्यांना पुण्याला काम मिळाले. या ठिकाणी जयवंताबाई नावाच्या महिलेशी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. इ.स. १९४४ मध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी लाल बावटा पथकाची स्थापना केली. महापुरूषांवर आधारित अनेक पुस्तके त्यांनी वाचून काढली...

            इ.स. १९४५ मध्ये अण्णाभाऊंचे पहिली कादंबरी चिया प्रकाशित झाली. पुढे अण्णाभाऊंनी वारणेच्या खोल्यात, मास्तर, घरणेचा वाघ, दिव्य, चंदन, चिखलातील कमळ, टिळा लाविते मी रक्ताचा, वैजंता, रत्ना, रानगंगा, आघात, गुलाम, मथुरा, मूर्ती, माकडीचा माळ अशा कितीतरी कादंब-या लिहिल्या. असंख्य कथा लिहिल्या. पोवाड्यांची रचना केली. वगनाट्य, नाटके, प्रवासवर्णन, चित्रपट कथा, यासंबंधी देखील अण्णाभाऊ साठेंनी लिखान केले. अगणित कृषीगीते, गवळणी, लावणी, भौमगिते इत्यादींची रचना केली. इ.स. १९५० से १९५६ च्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साहित्यक्षेत्रात अतिउच्च शिखरावर जाऊन बसले होते. एक सच्चा समाजसेवक म्हणून अण्णाभाऊंनी परिवर्तनाची फार मोठी चळवळ उभी केली. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या फकिरा या कादंबरीस महाराष्ट्र सरकारने प्रथम पारितोषिक देवून अण्णाभाऊंचा गौरव केला. इ.स. १९६१ ला अण्णाभाऊंनी रशियाला प्रयाण केले. तारकंद, लेनिनग्राड, मॉस्को, स्टॅलिनग्राड इत्यादी शहरांना भेटी दिल्या. रशियाला छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख करून दिली. अण्णाभाऊ नेहमीच उपेक्षित माणसांच्या बाजूने उभे राहिले.

            साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै, १९६९ रोजी निधन झाले. या महामानवास जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !.....

*✒️संकलन - मा.पी.डी.पाटील सर* 

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव.

मो. ९४०३७४६७५२

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!