रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) खिर्डी बु.येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये रेंभोटा रस्त्यावर असलेल्या स्मशान भूमी जवळ घंटा गाडीद्वारे मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा टाकला जातो.तसेच तो कचरा खड्यात नं टाकता रोडवरच पसरून टाकून देतात. व पायी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, शेतकरी,तसेच खिर्डी येथे येणारे शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना रोज त्याचा दुर्गंधी मुळे त्रास होत असून आरोग्यावर परिणाम होण्याची संभावना उद्भवू शकते.[ads id="ads1"]
सध्या पावसाच्या पाण्यामुळे सदरील कचरा सडला असून या टाकलेल्या कचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून टाकलेली घाण ही आरोग्यास हानिकारक असून त्यातून निघणाऱ्या विषारी वायू मुळे होणाऱ्या प्रदूषणाची धग वाढत चालली आहे.तसेच त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.[ads id="ads2"]
त्यात आधीच पूर्ण देश कोरोनाच्या संकटातून सावरत असतांना, सध्या डेंग्यू सारख्या आजाराने तोंड वर काढले असतानांच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर ठोस उपाय योजना करीत नसल्याने कचऱ्याची दुर्गंधी येत असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या मात्र अतिशय त्रास होत आहे. शेजारीच हाकेच्या अंतरावर गाव, शाळा असून त्यांना एखाद्या संसर्गजन्य आजारांना तोंड देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.यावर स्थानिक प्रशासनाने त्वरित काळजीपूर्वक लक्ष देवून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी.तसेच पुन्हा त्या ठिकाणी घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी.अशी मागणी अर्जाद्वारे रेभोटा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गाढे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
खिर्डी रेभोटा रोडच्या बाजूला असलेला घाण कचरा उचलण्या संदर्भात आपण दोन तीन वेळेस तोंडी समजावून सांगितले असून त्यांनी अद्यापही कचरा बाजूला अथवा उचलला नसल्याने त्यांना रितसर खिर्डी बु,ग्रामपंचायत ला लेखी अर्ज देऊन मागणी केली आहे.
@ आकाश कोचूरे -रेभोटा