धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - आपल्या धरणगाव शहरातील धरणी चौक येथील गटारीना लोखंडी जाळी व पुलास कठडे बसवावेत कारण त्या ठिकाणी पाणी वरून वाहते गटार दिसत नाही व शाळेचे मुले - मुली गटारीत वाहून जाण्याची मोठी शक्यता आहे . तेव्हा दुर्घटना होण्याच्या अगोदर 'एखादा जीव जाण्याच्या अगोदर हे काम झाले तर बरे .. होईल . या ठिकाण वरुन खुप विद्यार्थी ये - जा करतात . [ads id="ads1"]
ह्या विषयावर तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य, धरणगाव यांनी निवेदनात नमूद केली आहे.[ads id="ads2"]
याप्रसंगी संघटनेचे विभागीय संघटक विनायक महाजन, जिल्हा संपर्कप्रमुख निलेश माळी, जिल्हा शोशलमिडीया प्रमुख जितेंद्र महाजन, शेतकरी आघाडी चे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ महाजन , धरणगाव तालुका अध्यक्ष दिनेश महाजन तसेच समाजातील तरुण समाजबांधव उपस्थित होते.
हेही वाचा :- विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना


