यावल (सुरेश पाटील) माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळातील आणि यावल तालुक्यातील रहिवासी असलेले शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना उर्फ तुषार सांडूसिंग पाटील यांची आता शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या गटाकडून हकालपट्टी होणार असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झाले आहे.या संदर्भात तसेच रावेर विधानसभा कार्यक्षेत्रात शिवसेनेची भक्कम फळी निर्माण करण्याच्या उद्देशाने संपर्कप्रमुख मोहन मसुरकर यांच्या उपस्थितीत काल शुक्रवार दि.22 रोजी यावल येथे तालुका शिवसेनेची बैठक संपन्न झाली.[ads id="ads1"]
काल झालेल्या बैठकीत शिवसेना जळगाव जिल्हा उपप्रमुख मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्या पदाबाबत आणि कार्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आणि अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले तसेच त्यांची उपजिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी होणार असून तालुक्यातील चिंचोली येथील गोपाळ चौधरी यांची नियुक्ती होणार असल्याचे यावल तालुका शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads2"]
शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वये रावेर विधानसभा संपर्कप्रमुख मोहन मसुरकर यांनी विधानसभा कार्यक्षेत्रात शिवसेनेची भक्कम फळी निर्माण करणेबाबत मार्गदर्शन व काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
हेही वाचा :- विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; जळगाव जिल्ह्यातील घटना
रावेर विधानसभा मतदार संघातील शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म भरताना शिवसेना पदाधिकारी यावल शिवसेना मध्यवर्ती कार्यालय यावल येथे रावेर विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली या बैठकीला रावेर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा संपर्कप्रमुख मा. मसुरकर साहेब तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख गडकरी साहेब रावेर विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाप्रमुख प्रल्हादभाऊ महाजन,उपजिल्हा संघटक दीपक बेहडे,यावल शिवसेना तालुका प्रमुख यावल रवींद्र सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख रावेर योगीराज पाटील,शिवसेना तालुका संघटक यावल गोपाल चौधरी,यावल शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,यावल तालुका उपप्रमुख शरदभाऊ कोळी,यावल उप तालुका प्रमुख विलासभाऊ चौधरी,न्हावी येथील उपतालुका प्रमुख फैजपूर राजेंद्र काठोके,शहर प्रसिद्धी प्रमुख यावल संतोष वाघ,माजी कृषी उत्पन्न यावल सभापती भानुदास भाऊ चोपडे,माजी तालुका प्रमुख विजयसिंह पाटील,माजी तालुका प्रमुख कडूभाऊ पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक वामनदादा नेहते, माजी जिल्हा परिषद सदस्य किरणभाऊ साळुंखे,चिंचोली आदिवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसेनभाऊ तडवी,यावल अल्पसंख्यांक तालुका प्रमुख अझर खाटीक,युवा सेना शहर अधिकारी सागर देवांग, सरचिटणीस सचिन कोळी, युवासेना यावल शहर संघटक सुनील बारी,शहर संघटक सुनील जोशी,उपतालुका संघटक योगेश चौधरी,उप शहरप्रमुख संतोष खर्चे,उपशहर प्रमुख योगेश राजपूत,उपशहर प्रमुख निलेश पाराशर,उपशहर प्रमुख शकील पटेल,विभाग प्रमुख सुधाकर धनगर,प्रल्हाद बारी,प्रवीण लोणारी,सारंग बेहडे,उदयसिंग पाटील,मयूर खर्चे,उपविभाग संघटक शहाजी भोसले, उपतालुका संघटक संदीप माळी, श्याम ठाकरे,हमीद पटेल,इमया सुदिन शेख,शफयुद्दीन खाटीक, डॉ.विवेक अडकमोल,विलास तळेले,फैजपूर येथील किशोर कपले,स्वप्निल करंडे,विरावली शाखाप्रमुख संजय मोतीराम पाटील,शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


