वढोदा गावा जवळ मोटारसायकलच्या अपघातात साकळी येथील येथील एकाचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मनवेल ता. यावल (गोकुळ कोळी) : यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ मोटरसायकलचा अपघात होवुन एक जण गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली असुन , गंभीर अवस्थेत जख्मी असलेल्या व्यक्तिस पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ते मृत्यू झाला.[ads id="ads2"]  

   या संदर्भातीत वृत्त असे की आज दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ६,३oते ७ वाजेच्या सुमारास अशोक पद्दमाकर नेवे ,वय ५४ वर्ष राहणार साकळी तालुका यावल हे यावल येथुन आपले व्यवसायीक काम आटोपुन आपल्या एमएच १९डी एक्स५४८२ या मोटरसायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ अचानक त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली वरून अशोक नेवे हे खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असुन , नागरीकांच्या मदतीने अशोक नेवे यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.[ads id="ads1"]  

   यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वेद्यकीय अधिक्षक डॉ बी बी बारेला त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले असता नेवे यांची प्रकृती ही अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ भुसावळ येथील एका खाजगी ! रुग्णालयात पाठविण्यात आले असता उपचार दरम्यान मृत्यू झाला .साकळी येथे दि.५ जुलै रोजी सकाळी दहा वाजता त्याच्या वर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.शिक्षक दामोदर नेवे व पत्रकार चद्रकांत नेवे यांचे बंधु होत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!