ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे शेतात नांगरणी करीत असतांना जवळच असलेल्या विज रोहीत्रा जवळील पोल ला दिलेल्या तन्नावाच्या ताराला स्पर्श होऊन तारात उतरलेल्या करंट चा शॉक लागून एक नागोरी जातीचा बैल ठार झाला आहे.[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे की दि.०४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता ऐनपुर येथील शेतकरी रविंद्र विश्वनाथ महाजन यांच्या मालकीच्या खिर्डी रोडवरील शेत गट क्रं. ७२९ या शेतात रविंद्र विश्वनाथ महाजन यांचे सालदार अशोक भिल्ल हा नांगरणी करीत असतांना शेतात असलेल्या विज रोहीत्रा जवळील लोखंडी पोल ला दिलेल्या तन्नावाच्या ताराला स्पर्श होऊन तारात उतरलेल्या करंट चा नागोरी जातीच्या बैलाला शॉक लागून बैल जागेवर मयत झाला बैलाला शिंग आणि कानाच्या खाली डाव्या बाजूला बर्गंडी जवळ करंट लागल्याचे व्रण दिसत होते.[ads id="ads1"]
या घटनेची सालदाराने रविंद्र विश्वनाथ महाजन यांना तात्काळ माहीती दिली विश्वनाथ महाजन यांनी शेतात जाऊन परीस्थिती पाहून ऐनपुर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशूधन विकास अधिकारी डॉ अभिजित डावरे यांना माहीती दिली याठिकाणी येवून डॉ अभिजित डावरे यांनी बैलाची तपासणी करून बैलाला मृत घोषित केले सदर घटनेची माहिती रविंद्र विश्वनाथ महाजन यांनी निंभोरा पोलीस स्टेशन ला दिली या खबरीवरून निंभोरा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश धुमाळ साहेब व ईश्वर चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेला जबाबदार महावितरण कंपनी असून ऐनपूर येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता देवेंद्र महाजन यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही . या ठिकाणी बैलाचा शॉक लागून मृत्यू झाला या ठिकाणी जो सालदार नांगरणी करत होता त्याचा जीव थोडक्यात बचावला परंतु बैलाला आपले प्राण गमवावे लागले अशा या महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गावात सुद्धा अनेक लोखंडी खांबांवर जवळील जोडलेल्या तारेला करंट उतरलेला असतो. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार महावितरण थांबणार आहे का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे? सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक वेळा लाईट ये-जा करीत असते सदर घटनेमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान महावितरण कडून वसूल करावे असा लोकांचा सूर दिसून येत होता. मयत झालेल्या बैलाचे वय १० वर्षाचे असून या नागोरी जातीच्या बैलाची किंमत ६५०००/ रूपये असल्याचे रविंद्र महाजन यांनी सांगितले सदर घटनेचा पंच लोकांसमोर पंचनामा करून CCTNS स्टे.डा.नं. ११/२०२२ दि. ०४/०७/२०२२ वर नोंद करून पशूधन विकास अधिकारी डॉ अभिजित डावरे यांनी शवविच्छेदन करून शेतात खड्डा करून बैलांचा दफन विधी करण्यात आला.