दोन वर्ष कोवीड १९ च्या प्रादुर्भाव मुळे खंडवा येथील गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता त्यामुळे पालखी बँद ठेवण्यात आली होती.
७ जुलै रोजी बुध गुरुवारी सकाळी ७ वा.पालखीचे पुजन दादाजी दरबार मनवेल येथे होईल व गावात पालखी मिरवणूक काढुन दिंडी मनवेल येथून खंडवाकडे प्रस्थान होणार आहे.[ads id="ads1"]
७ जुलै रोजी गुरुवारी यावल येथे , ८ जुलै रोजी सावदा येथे , ९ जुलै रोजी निरुळ ,१० जुलै रोजी आशीरगड (म.प्र.) येथील रुपेश्वर महादेव मदिर ,११ जुलै रोजी रुस्तंणपुर (म.प्र.)येथे मुक्काम व १२ जुलै रोजी पालखी रोजी खंडवा येथे दाखल होणार आहे.
ज्या भावीकांना पायी दिंडीत सहभागी व्हायचे आहे त्यानी संतोष (तात्या)पाटील, गजानन पाटील, सुभाष अशोक पाटील ,पन्नालाल पाटील , सोपान पाटील ,योगराज पाटील ,कीशोर पाटील,यांंचा शी संपर्क साधावा असे आवाहन धुनीवाले दादाजी दरबार मनवेल यांनी केले आहे.