नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आज सकाळी आश्रम शाळेत चौकशीसाठी दाखल झाल्या. यावेळी शाळेतील शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली,होती शाळेत प्रकल्प अधिकार आले अशी बातमी मिळताच नाशिक हुन भरधाव वेगाने निघालेल्या शिक्षिकेंच्या वाहनाचा त्र्यंबकेश्वर येथे अपघात झाला वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी थेट [ads id="ads1] रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली, या अपघातात कवितां बेडकोळी, नवले, सूर्यवंशी या तिन् शिक्षिका जखमी झाल्या असून त्यांना घोटी येथे उपचारासाठी दाखल केरण्यात आले आहे.
सविस्तर असे की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील असलेल्या शासकीय कन्या आश्रम शाळेत शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव केल्याची धक्कादायक घटना समोर आली त्या नंतर अदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शिक्षकांची समिती नेमून या प्रकरणा चौकशी करण्याचे आदेश दिले[ ads id="ads2] याची दखल घेत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आज सकाळी आश्रम शाळेत चौकशीसाठी दाखल झाल्या. अशी घटना घडली, शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान शिक्षक आर टी देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहेत त्यांनी झाड लावू नये, मागच्या वेळेस झाडे जगली काही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जा केला, शिक्षकाच्या या वर्तणुकीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. अधिकारी येणार असल्याची बातमी मिळताच नाशिक हुन भरधाव वेगाने निघालेल्या शिक्षिकेंच्या वाहनाचा त्र्यंबकेश्वर येथे अपघात झाला मग हे शिक्षक निवासी राहत नसल्याचे ही यातुन सिद्ध होते.. निवासी घरे कोणासाठी असा प्रश्न देखील येथे उपस्थित होतो. नाशिक विकास विभागाच्या शाळेत शिक्षक कर्मचारी निवासी असतात की नाही यांची देखील चौकशी होणे तितकेच महत्त्वाचे दिसून येते.
हेही वाचा : रावेर पंचायत समितीतील शौचालय प्रकरणातील पुन्हा ६ जणांना अटक ; आता पर्यंत आरोपींची संख्या पोहचली १८ वर
हेही वाचा : घटस्फोट झालेल्या तरुणीने भुसावळ येथील तापी नदीत उडी घेत संपवली जीवनयात्रा
विद्यार्थ्यांनीने सांगितले की -
यंदा ज्या मुलींना मासिक पाळी आहे त्यांनी वृक्षारोपण करू नये असे म्हणत त्यांनी मला झाड लावू दिले नाही. याबाबत मी त्यांना विचारले तर तू जास्त बोलते असं म्हणत HSC 12वी च्या परीक्षेत तुला कमी मार्क दिल असे मला धमकावले, आश्रम शाळेत अनेक समस्या आहेत. नाष्टा व जेवण चांगले मिळत नाही ,शाळेत विद्यार्थ्यांनीन कडून साफसफाई करण्याचे काम करून घेतात, अंघोळी साठी गरम पाणी मिळत नाही अशा अडचणींना आम्हा मुलींना सामोरे जावं लागत आहे असे त्या विद्यार्थ्यांनीने सांगितले की आता मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही आणि इतर माझ्या मैत्रिणी व विरोध करणाऱ्यांना यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थिनीने दिली आहे.
घटनेची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
शिक्षकाने एका बारावीच्या मुलीला मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत...