रावेर तालुक्यातील कुसुंबा (Kusumba Taluka Raver) येथील अठरा वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी उघडकीस आली आहे. पूजा रविंद्र तायडे (वय १८, रा. कुसुंबा ता. रावेर) असे मृत तरूणीचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात (Raver Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
पूजा तायडे ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह कुसुंबा येथे राहत होती.बुधवारी २० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातील बाथरूमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. तातडीने तिला रावेर ग्रामीण रूग्णालयात (Raver Rural Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.


