वाघोदे खु येथील "त्या" कुटुंबाला ग्रामपंचायत हद्दीतील जागा देऊन त्यांचे पुनर्वसन होणार ; भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा युनिट च्या क्रांतीलढ्याला यश....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


महामानव,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शपथ सार्थ ठरविली.....

ऐनपुर ता.रावेर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल  

   भिम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक प्रमुख,बहुजन हृदय सम्राट चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यनेतृत्वावर विश्वास ठेवून भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे यांचे नेतृत्वात दि.१७ जुलै २०२२ रोजी,वाघोदे खुर्द ता.रावेर येथे अतिक्रमण ग्रस्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेकडो पदाधिकारी यांनी भेट दिली.[ads id="ads1"]  

 सदर भेटीवेळी भिम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रमुख यांनी पीडितांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे वचन दिले.[ads id="ads2"]  

            सदर वचनाला सार्थकी ठरवण्यासाठी आज दि.१९ जुलै रोजी भिम आर्मी जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे हे आपल्या स्वतःच्या वाहनात पीडित कुटुंबाला घेऊन रावेर तहसील कार्यालय येथे धडकले असता पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी अश्या स्वरूपाचे निवेदन दिले असता मा.तहसीलदार उषाराणी देवगुणे मॅडम यांनी घटनेचे गंभीर्य बघून तेथे उपस्थित वाघोदे खु. गावचे ग्रामसेवक यांना नोटिस स्थगित करून पीडितांना न्याय देण्याचे दृष्टीने ग्रामपंचायत हद्दीतील जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले.

   सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले व भिम आर्मी भारत एकता मिशन,जळगांव जिल्हा युनिट ने तेथील हुकूमशाही ग्रामपंचायत प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडला व सदर प्रसंगी शेकडो पदाधिकारी हजर होते अशी माहिती भिम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.प्रबुद्धजी खरे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!