विवरे प्रतिनिधी (समाधान गाढे) निंभोरा पोलीस स्टेशन चे एपीआय गणेश धुमाळ व एफएसआय रा.का.पाटील, पोहे.का. विकास कोल्हे व पोलीस कर्मचारी यांना गस्त करीत असतांना सिंगत (Singat Taluka Raver) गावाजवळ पावसात पूर्णतःभिजलेला व थंडीने कुडकुडत असलेला एक वेडसर इसम आढळून आला असता त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्या कडे रितसर विचारपूस करण्यात आली असता.[ads id="ads2"]
त्याने धोलकुत पोलीस स्टेशन जिल्हा बुऱ्हाणपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगून त्याने मगन भिलाल असे नाव सांगितले. निंभोरा पोलिसांनी धोलकुत पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सदर इसमाबाबत माहिती देण्यात आली असून त्याचे वडील बारसिंग भिलाल यांचेशी संपर्क साधला असता सदर मुलगा वेडसर असून गेल्या १५ दिवसांपासून घरून निघून गेला असल्याचे सांगितले त्यांना निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलवून योग्य ती खात्री करून आज संध्याकाळी ७वा४० मिनिटाच्या सुमारास सदर इसम मगन भिलाल यास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. निंभोरा पोलिसांनी केलेल्या कार्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


