गुरुपौर्णिमा या पवित्र दिवसाचा मुहूर्त साधत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची आढावा बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

     


 पारोळा येथील चैतन्य महाराज आश्रम येथे अत्यंत उत्साहात पार पडली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जळगांव जिल्हाध्यक्ष, प्रहारचे खंबीर ,धडाकेबाज निर्णय घेणारे माननीय बाळासाहेब पाटील हे होते.बैठकीत जिल्हा सल्लागार राजमल दादा यांनी आपल्या प्रस्तावनेत नुकताच बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात प्रहारसेवकांनी वेगवेगळ्या तालुक्यात जे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads2"]  
  त्याबाबतीत धावता आढावा मांडला.त्यानंतर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित सर्व प्रहारसेवकांना, पदाधिकारी यांच्यासमोर एक एक करत 10 विषय मांडून त्याविषयी उपस्थित प्रहारसेवकांचे मत मागितले.विशेष म्हणजे सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. आज जळगाव जिल्ह्यातील,सर्व तालुक्यातील प्रहार दिव्यांग तालुका  अध्यक्ष यांची बैठक बोलविण्यात आली.[ads id="ads1"]  
  मुक्ताई तालुका अध्यक्ष,उत्तम दादा जुम्बळे,रावेर तालुका अध्यक्ष,विनोद कोळी,तसेच जिल्ह्यातील पूर्ण तालुका अध्यक्ष  उपस्थीत  होते.त्यानंतर काही महिला पदाधिकारी आणि 2 पुरुष पदाधिकारी यांना नियुक्त्या देण्यात आल्या.आजच्या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पदाधिकार्यामुळे पारोळा तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा पगार(दिव्यांग अनुदान,1000 रु)बंद करण्यात आले, तो जिल्हा उपाध्यक्ष आज पदमुक्त करून ते पद शकील शेख यांना देण्यात आले.अशारितीने आजची बैठक संपन्न होऊन शेवटी गुरुपौर्णिमा निमित्ताने प्रसाद वितरीत करून बैठक संपल्याचे घोषित करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!