अपंगात्वाचे बनावट दाखल देऊन बदलीत सोयीचे ठिकाण मिळविल्याच्या प्रकरणात रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 अपंगात्वाचे बनावट दाखल देऊन बदलीत सोयीचे ठिकाण मिळविल्याच्या प्रकरणात Raver तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की, Raver तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामसेवक शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्र कुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील यांनी आपल्याला हव्या त्या ठिकाणी बदली करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.[ads id="ads2"] 

याप्रकरणी निंबोल (Nimbol Taluka Raver) येथील किशोर भिवा तायडे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन न्यायाधीश अनंत बाजड यांनी सदर सहाही ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात फिर्यादींच्या वतीने ऍड. कुणाल गवई यांनी काम पहिले. 

फसवणुकीतून प्रामाणिक लोकांवर अन्याय झाला

■ खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करत या सहा ग्रामसेवकांनी मर्जीच्या ठिकाणी वारंवार बदलीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे प्रामाणिक व निष्ठेने काम करणाऱ्या ग्रामसेवकांवर अन्याय झाला. त्यामुळे न्यायालयात दाद मागितली.

            किशोर तायडे, फियादी, निंबोल ता. रावेर

 या प्रकरणी धुळे (Dhule) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने चौकशी करून अहवाल सादर केला होता. यात शिवाजी सोनवणे यांची अँजिओप्लास्टी झालेली असताना त्यांनी हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला आहे. तर उर्वरित पाच जणांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थायी वैद्यकीय मंडळाने दिलेला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!