पॅरोल रजेवर आलेले तीन कैदी रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यातून पसार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर /मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) कोरोना काळात नाशिक कारागृहातून रजेवर आलेले तीन कैदी पसार झाल्याने मुक्ताईनगरसह निंभोरा पोलिसात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.[ads id="ads2"]  

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ येथील राजू उर्फ राजेंद्र बळीराम बोरसे हे यांना कोरोना रजेवर सोडल्यानंतर त्यांनी 21 मे पर्यंत नाशिक कारागृहात रजा संपल्यानंतर परतणे गरजेचे होते मात्र ते न परल्याने या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे सूर्यकांत विठ्ठल पाटील (47, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि 224 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"]  

  दुसऱ्या घटनेत राजू उत्तम बेलदार (कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर) हे देखील घरी रजेवर आल्यानंतर 2 जूनपर्यंत परतणे गरजेचे असताना न परतल्याने नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे सूर्यकांत विठ्ठल पाटील (47, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसऱ्या घटनेत मधुकर धुमा गाढे (विवरा बु.॥ ता. रावेर) हे पॅरोज रजेवर आल्यानंतर 13 जूनपर्यंत कारागृहात परतणे गरजेचे होते मात्र न परतल्याने निंभोरा पोलिसात सूर्यकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार भादंवि 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!