रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) आषाढी एकादशी आणि बकरी ईद यांच्या अनुषंगाने रावेर पोलीस स्टेशन येथे आज दि. ६ जुलै बुधवार रोजी सायंकाळी ७ वाजता शांतता समितीची बैठक घेण्यात आली.[ads id="ads2"]
यावेळी मार्गदर्शन करतांना रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बकरी ईद निमित्त पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या आदेशाचे पालन करा. कुर्बानी नंतर वाटप होणारे साहित्य वाटपासाठी लहान मुलांचा वापर करू नका. [ads id="ads1"]
अनावश्यक साहित्याची विल्हेवाट नीट लावावी. आगामी निवडणुकांची देखील चाहूल आहेच . नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक असून अपप्रवृत्तीना बळी पडू नये कुठलीही सूचना अथवा माहिती पोलिसांना निःसंकोचपणे द्यावी . पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे. असेही आवाहन त्यांनी केले
यावेळी बैठकीस माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, डॉ सुरेश पाटील, ऍड योगेश गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, युसूफ खान इब्राहिम खान, शेख आरिफ, शेख युसूफ, शेख सादिक, पोलीस पाटील लक्ष्मीकांत लोहार, रवींद्र रायपूरे,मुरलीधर महाजन,शे कलीम,, शैलेश अग्रवाल, गयासोद्दीन काझी, संतोष पाटील, अशोक शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, इमरान खान, सावन मेढे, संघरक्षक, तायडे, पंकज वाघ, बाळू शिरतुरे, नितीन पाटील, असदुल्ला खान, हिलाल सोनवणे, फिरोज खान, इस्माईल पहेलवान अय्युब पहेलवान, कल्लू पहेलवान, इमरान शेख, शेख महेमुद, भाऊलाल महाजन,उपस्थितहोते
तर बैठक यशस्वीतेसाठी सहा फौजदार राजेंद्र करोडपती, विजू जवरे, पुरूषोत्तम पाटील, रवी भामरे यांनी परिश्रम घेतले.



