Raver : तालुक्यातील सांगवे येथे आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी..... ग्रामपंचायत चा कारभार चव्हाट्यावर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर येथून जवळच असलेल्या सांगवे गावात पावसाचे पाणी येथे राहत असलेल्या आदिवासी लोकांच्या घरात शिरल्याने आदिवासी लोकांचे त्या घरात राहणे मुश्कील झाले आहे सांगवे विटवे ही गृप ग्रामपंचायत असून सांगवे येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी किंवा लेखी स्वरूपात गावातील सांडपाणी काढणे बाबत वारंवार सांगूनही सदर गावातील सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत ने केली नाही ऐन पावसाळ्यात पावसाचा जोर वाढला असता गावातील सांडपाणी या ठिकाणी राहत असलेल्या मागासवर्गीय व आदिवासी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली.[ads id="ads2"]  

   या बाबतीत आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी नायब तहसीलदार संजय तायड़े यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे कि गृप ग्रामपंचायत विटवे यांच्या कड़े लेखी व तोड़ी स्वरुपात सांगितले तरीही सदर सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने आज पावसाचे जास्तीचे पाणी आदिवासींच्या घरात शिरले व त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून घराच्या भिंती पडक्या झालेल्या आहेत.[ads id="ads1"]  

  त्या केव्हाही कोसळून पडु शकतात त्यामुळे जीवित हानी होऊन संसार उघड्यावर येऊ शकतो अशा आशयचे निवेदन देण्यात आले निवेदनावर, जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष, साहेबराव वानखेड़े पं. समिती सदस्य दिपक पाटील ग्रा. पं. सदस्य. सुरेश कोळी, रतन भिल्ल, शिवाजी कोळी, गजानन कोळी, वंदना भिल्ल, उषाबाई भिल्ल, कंबाबाई कोळी, सखुबाई भिल्ल, शुभम कोळी, विमलबाई भिल्ल, छाया बाई भिल्ल, यांच्या सह्या आहेत

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!