रावेर प्रतिनिधी-विनोद कोळी
रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द. येथे भर पावसात ग्रामपंचायत ने जो दलित कुटुंबावर भर पावसाळ्यात घराचे अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिली,व कारवाई करणार होते ,त्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष कडून या वाघोदा खु.गावात भेट देण्यात आली. व या प्रकरणाची सर्व शहानिशा केली.[ads id="ads2"]
व पीडित कुटुंबास न्याय कसा देता येईल यासाठी वाघोडे खु चे सरपंच रवींद्र कोलते व ग्रामसेवक श्रीकांत पाटील यांना धारेवर धरले व 8 दिवसात या कुटुंबांना न्याय मिळावा, व गावातील दुषित पाणी व खराब रस्ते या समस्या सोडवण्यात याव्या अन्यथा प्रहार जनशक्ति पक्ष या विषयावर मोठे आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रहार संघटने तर्फे देण्यात आला.[ads id="ads1"]
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षा चे रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे,व मागासवर्गीय जील्हा अध्यक्ष, विनोद निकम तसेच यावल तालुका युवा अध्यक्ष,र सागर भाऊ तायडे .यावल तालुका संघटक, राकेश भाऊ भंगाळे.रावेर तालुका अल्पसंघटक अध्यक्ष वसीम शेख.यावल तालुका सरचिटणीस नितीन भाऊ सपकाळे ,व प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व वाघोदा येथील राजू पटेल सर, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.