ऐनपूर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपूर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्ताने दिनांक १३/०७/२०२२ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने हे होते. [ads id="ads2"]  
  या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर. पी. पाटील यांनी जो आपल्याला प्रेरणा देतो तो प्रथम आपला गुरु. आशावादी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून जो बघतो तो आपला गुरु असे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले. तसेच पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के.जी. कोल्हे यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनामधील गुरु शिष्यामध्ये असलेलं नातं हे उदाहरणावरून स्पष्ट केले. [ads id="ads1"]  
  तसेच रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी जो आपल्याला प्रेरणा देतो. ज्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते तो आपला गुरु असे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले. तसेच अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. नीता वाणी यांनी आई ही सर्वोत्तम व पहिला गुरु होय असे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतो तो आपला गुरु असे त्यांच्या अध्यक्ष मनोगतात सांगितलेे.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. व्ही. एन रामटेके यांनी केले.या कार्यक्रमाच्या आयोजनमध्ये डॉ.एस एन वैष्णव डॉ.जे.पी नेहेते, व्ही.एच. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक एस. पी. उमरीवाड यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!