"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृती अभियान"

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


 ऐनपूर प्रतिनिधी (विजय अवसरमल) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर व श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जुलै 2022 रोजी "हर घर तिरंगा जनजागृती अभियान " अंतर्गत एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads2"]  

  त्यात प्रमुख वक्ता मा. सुनील कुलकर्णी, संचालक, विद्यार्थी विकास, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की अमर सेनानी व थोर नेत्यांचे आपल्याला सतत स्मरण राहावे, तसेच स्वातंत्र्याचा दैदिप्यमान इतिहास आपल्याला कळावा हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच दुसरे प्रमुख वक्ते प्रा. डॉ जगदीश तोरवणे, क्रीडा संचालक,स्व. आण्णासाहेब डी आर देवरे महाविद्यालय, म्हसदी यांनी भारतीय ध्वज संहिता सांगितली.तिरंग्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ध्वज केव्हा फडकावला जातो या बाबतीत महत्वपूर्ण माहिती दिली.[ads id="ads1"]  

  कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी प्रास्ताविक केले.तसेच प्राचार्य डॉ. रमेश जोशी, भुसावळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हा कार्यक्रम आंतर- विद्यापीठ कार्यक्रम म्हणून साजरा झाला आहे असे सांगितले .अनेक वीर स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यात अनेक थोर नेते आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

  हर घर झेंडा जनजागृती अभियान सफल करण्याची जबाबदारी सर्व नवयुवकांची आहे असेही त्यांनी सांगितले . दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करावा असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. डॉ विनोद रामटेके यांनी केले व आभार डॉ. सुधीर शर्मा यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांनी परिश्रम घेतले.२०८ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!