ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
आज दिनांक26/7/22/ रोजी प्रहार जन शक्ती पार्टीचे रावेर तालुका दिव्याग समितीचे उप अध्यक्ष जितेंद्र कोळी व ऐनपूर शाखा सचिव हसन शेख यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगाव येथे बाल संगोपन योजनेचा लाभ मिळावा असा मागणीचा अर्ज दिला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की ऐनपूर येथील विधवा महिला यानी आपल्या मुलाना बाल संगोपन योजनाचा लाभ मिळावा यासाठी महीलानी जळगाव येथे जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी जळगाव यांच्या कडे सर्व महिलांनी अर्ज दिला शासनाची बाल संगोपन योजना ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील व ज्या मुलांना आई व वडिल दोन्ही ही नसतील अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो. [ads id="ads2"]
० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना लाभ दिला जातो. एका मुलासाठी ११०० रुपये प्रति महिना ( एका वर्षाला १३२०० रुपये मिळतात वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला ही रक्कम मिळते. म्हणून या योजनेचा या बालकांना लाभ मिळावा अशी विधवा महिला मागणी करत आहे. मागणी करणाऱ्या विधवा महिला पुढील प्रमाणे . शारदा विनोद भोई , मनिषा जितेन्द्र इंगळे , वैशाली मुकेश रायपुरे, सुरेखा संतोष बारी , ज्योती संतोष तायडे , मनिषा योगेश तुरुकमाने , सुनीता समाधान रायमळे व प्रहार दिव्यांग समितीचे जितू कोळी उपस्थित होते.


