बस सेवा शाळेच्या वेळेत सुरू करण्यासाठी रावेर बस आगार प्रमुखांना स्मरणपत्र

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिनांक २९/०६/२०२२ रोजी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बस सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी पत्र दिले होते.[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बरेच विद्यार्थी बाहेर गावाहून ये जा करीत असतात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील महिन्यांपासून बससेवा पुर्ण पुणे सुरू नव्हती त्यामुळे विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.[ads id="ads2"] 

  तरी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी शाळेकडून पत्र देण्यात आले होते त्या पत्रात शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार १०.५५ वा.ते दुपारी ४.३० वा.पर्यंत व शनिवारी सकाळी ७.२५ वा.ते सकाळी ११.३० वा.पर्यंत नमुद केले होते तरी विद्यार्थांचा सहानुभूती पुर्वक विचार करून व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यासाठी सदर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी या संदर्भाचे पत्र दिले असतांना सुध्दा शाळेच्या वेळेनुसार बससेवा सुरू नसून शाळेत निंबोल विटवा सांगावे धामोडी कांडवेल सुलवाडी कोळदा या ठिकाणावरून विद्यार्थी ये जा करीत असतात त्यांना बस साठी सकाळी लवकर शाळेत येऊन बसावे लागते आहे तर दुपारी शाळेचे शेवटचे दोन तास बुडवून बससाठी जावे लागते आहे तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याचा सहानुभूती पुर्वक विचार करून शाळेच्या वेळेनुसार बससेवा सुरू करण्यात यावी असे स्मरणपत्र स्वतः विद्यार्थ्यांचे पालकांनीच रावेर आगार प्रमुखांना दिले आहे स्मरणपत्र देण्यासाठी वासू पाटील, सुरेश महाजन,मोहन कचरे प्रकाश जोगी उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!