मनवेल ता.यावल (गोकुल कोळी) : जिल्हा परीषद शाळेचे शिक्षक आपल्या मर्जी प्रमाणे येतात व जातात शासनाकडुन ठरवून दिलेल्या वेळापत्रकचे बंधन कागदावर असून नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.[ads id="ads2"]
शिक्षक वर्ग तालुक्यातील व जिल्हायातील ठिकाणाहून ये- जा करीत असल्यामुळे शाळेत कधी उशिरा येतात तर संध्याकाळी घरी जाण्यासाठी कधी लवकर जातील याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे शाळेला वेळाचं बंधन नसल्यामुळे मर्जीपणे ये- जा करीत असल्याने आधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यातील ठरावीक शाळेतील शिक्षक शाळेत ये - या करताना वेळापत्रकला तिलांजली देत ये - जा करतात तर काही तहसिल व पंचायत समीतीचा आवारात भंटकती करताना दिसून येत असल्यामुळे त्याचावर कुणाच्या कृपा आशिर्वाद आहे का ? असा प्रशन सुज्ञ पालकांना पडत आहे. [ads id="ads1"]
विशेष म्हणजे काही संघटना व राजकीय मंडळीचे आश्रय घेत जाणे - येणे टाळत असतात तर काही मुख्यध्यापक याःना सुद्धा बोलू देत नाही नाही तर काही आर्थिक चीरी मीरी देवून शाळेवर जाणे टाळत असल्याचे चित्र असून याकडे कर्तव्यदक्ष जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी पंकज आशिया साहेब यांनी लक्ष घालावे आशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

