दि.9/7/22 रोजी श्री शिव प्रतिष्ठान रावेर संचालित सरस्वती विद्या मंदिर रावेर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये बालवर्ग ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. [ads id="ads2"]
सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी च्या वेशात असलेल्या विद्यार्थ्यांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर व्यवस्थापक श्री विकास पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृती तील वारकरी संप्रदायाचे महत्व भक्त पुंडलिकाची गोष्ट या प्रसंगी विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.[ads id="ads1"]
याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री विनोद पाटील, श्री मोहन बारी सर, सौ ललिता राणे, श्री उमेश चौधरी, श्री राजेंद्र सपकाळ, श्रीम. उषा चव्हाण, श्री चंद्रकांत पाठक, श्री नितीन पाठक, श्री सागर पवार, श्रीम.अनिता सपकाळे, अश्विनी गाढे, आदि शिक्षक शिपाई श्री जितेंद्र कानूगो आदी उपस्थित होते.


