यावल दि.29(सुरेश पाटील)
यावल केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत फेरीवाला धोरणाची अमंलबजावणी करण्यात येत असुन त्या अनुशंगाने यावल नगपालिकेच्या माध्यमातुन पथविक्रेता सर्वेक्षण सुरु आहे.आतापर्यंत एकूण 276 पथविक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली असून 10 ऑगस्ट 2022 पर्यंत पथविक्रेत्यांची नोंदणी केली जाणार आहे तरी पथविक्रेत्यांनी यावल नगरपालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन यावल नगरपालिका मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे. [ads id="ads1"]
सर्वेक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे यावल नगपरिषदेच्या माध्यमातुन आज पर्यंत २७६ पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन शहरात १० ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी पथविक्रेत्याजवळ नोंदणी करताना आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर,रेशनकार्ड,जात प्रमाणपत्र, डोमेसाईल,दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र इ.कागदपत्र आवश्यक आहेत.[ads id="ads2"]
तसेच यानंतर कुठल्याही पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार नाही तरी ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले आहे अशाच पथविक्रेत्यांना अधिकृत पथविक्रेते म्हणुन गृहीत धरले जाईल म्हणुन ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही अशा फेरीवाल्यांनी आपले सर्वेक्षण करून घ्यावे तसेच ज्या पथविक्रेत्यांनी सर्वेक्षण करून झाले परंतु कागदपत्र जमा केले नाही अशा पथविक्रेत्यांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर सर्वेक्षकाकडे जमा करावी असे आवाहन यावल न.पा. मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.