मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल येथील 54 वर्षीय प्रौढाने कर्ज बाजारीपणामुळे पिंप्रीनांदू येथील पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. गुरुवार, 7 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
कर्ज बाजारी पणामुळे आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर तुकाराम तायडे (54, रा. नरवेल) यांनी गुरुवारी दुपारच्या पिंप्रीनांदू येथील कर्ज बाजारी पणामुळे पुलावरून उडी घेतल्याने तापी पात्रात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.[ads id="ads2"]
मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचा भाऊ याने मुक्ताईनगर पोलिसात खबर दिल्यावरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक गजमल पाटील हे करीत आहेत.


