मनवेल ता. यावल (गोकुल कोळी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षा- २०२२ या परीक्षेमध्ये साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेले असून या शाळेचा विद्यार्थी इंद्र गणेश कपले हा यावल तालुक्यातून प्रथम क्रमांकाने पात्र ठरलेला आहे.[ads id="ads2"]
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश मिळवण्याची परंपरा सदर शाळेने कायम ठेवलेली आहे.या परीक्षेत शाळेतील विद्यार्थी इंद्र गणेश कपले,कृष्णा मनोज महाजन व कु.अपेक्षा रतिलाल सुरवाडे हे तीन विद्यार्थी पात्र ठरले आहे . यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक आर.जे.महाजन,पर्यवेक्षक एस.जे. पवार तसेच संबंधित सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. [ads id="ads1"]
सदर परिक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष वसंतराव महाजन, उपाध्यक्ष सुभाष महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, माजी जि.प.सदस्या तसेच संस्थेच्या संचालिका सौ. विद्याताई महाजन तसेच संस्थेचे सर्व संचालक त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक आर.जे.महाजन, पर्यवेक्षक एस.जे.पवार माजी मुख्याध्यापक जी.पी.बोरसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले आहे.


