महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालय आवारात वृक्षारोपण संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

 आज दि१७जुलै रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.[ads id="ads1"]  

 आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मनोहर जाधव पोलीस उप निरीक्षक रावेर पोलीस स्टे, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्या वृक्ष लागवड मोहीम ही केवळ वृक्ष लागवड मोहीम न राबवता मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.मनोहर जाधव पोलीस उप निरीक्षक रावेर यांनी व्यक्त केले.[ads id="ads2"]  

तसेच झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेत सामील होवून वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करावा.असे मत डॉ.योगेश राणे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय रावेर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी, जी.एन.शेलकर मंडळ अधिकारी ऐनपुर, विनोद कोळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, प्रमोद कोंडे,सुमित पाटील,इकबाल पिंजारी,विजय एस अवसरमल,अनिल इंगळे, प्रशांत पाटील, विजय के अवसरमल भिमराव कोचुरे,संजय पाटील मान्यवरांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!