आज आता रात्री दीड तासानंतर 12:05 मिनिटांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन.

अनामित
ऐन वेळेला कार्यक्रम ठरल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात खळबळ.

यावल ( प्रतिनिधी :  सुरेश पाटील) आज आता रात्री दीड तासानंतर 12:05 मिनिटांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन.ऐन वेळेला कार्यक्रम ठरल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात खळबळ.  संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन सकाळी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे पण आता आपल्या जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात (आजादी का अमृत महोत्सव) फैजपूर येथील "1936 च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशन संकल्पचित्र" छत्री चौक फैजपुर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री 12:05 मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे आणि तसे सोशल मीडियावर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मेसेज देण्यात आले आहेत हा नवीन पांयडा प्रथा कौतुकास्पद असला तरी ही प्रथा नवीनच जळगाव जिल्ह्यात सुरू होत असल्याने याबाबत जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा माहिती कार्यालय जळगाव,पोलीस अधीक्षक जळगाव यांनी याबाबत जनतेच्या माहितीसाठी लेखी खुलासा करणे आवश्यक होता आणि आहे, आणि अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस ध्वजारोहण करण्याबाबत कायदेशीर नियम तरतुदीनुसार याची पूर्वसूचना संबंधित अधिकाऱ्यांना ध्वजारोहण करणाऱ्यांनी दिली आहे किंवा कसे? किंवा याची रीतसर परवानगी घेतलेली आहे का? इत्यादी अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात असून यावल तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागासह जळगाव जिल्ह्यात याबाबत वाऱ्यासारखी जोरदार चर्चा सुरु आहे.
         ही नवीन प्रथा कौतुकास्पद असली तरी आयोजकांनी आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघात आज सकाळी किंवा एक दिवस आधी रात्री ध्वजारोहण केले जाणार असल्याची माहिती जनतेच्या माहितीसाठी जाहीर सूचना किंवा माहिती जाहीर केली असती तर या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला असता असे सुद्धा आता राजकारणात आणि समाजात बोलले जात आहे.
        अशाच प्रकारे अहमदनगर शहरातील दाणेडबरा मंगल गेट भागात 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री बारा वाजता झेंडा फडकवला होता तीच प्रथा आजही तिथे कायम आहे,आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रुप पेठवडगावची पोस्ट नगर मधील व्यापारी,उद्योजक आणि स्वातंत्र्य सैनिक यात सहभागी होतात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीला जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती कलावती दारुणकर यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात आला अशी खात्रीशीर माहिती आहे.
       मग अशा प्रकारे आज फैजपूर येथे सुद्धा रात्रीच्या वेळेस 
संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघातील व्यापारी,उद्योजक, आणि स्वातंत्र सैनिक व सर्व स्तरातील नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत का ? असे प्रश्न यावल तालुक्यात आणि संपूर्ण भुसावळ विभागात चर्चिले जात आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!