19 वर्षीय तरुणाचा वीज प्रवाह उतरलेल्या ट्यूबवेलचा शॉक लागल्याने मृत्यू : जळगाव जिल्ह्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  जळगाव : तालुक्यातील कुवारखेडा गावातील 19 वर्षीय तरुणाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात (Jalgaon Civil Hospital) तीव्र संताप व्यक्त केला. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (19, कुवारखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.[ads id="ads1"] 

फवारणीसाठी आल्यानंतर दुर्घटना

वडिलांना शेतात फवारणी करण्यास मदत करण्यासाठी ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा तरुण शेतात आला असता फवारणीसाठी पाण्याची टाकी भरायची असल्याने तो शेतातील ट्युबवेल सुरू करण्यासाठी गेला असता वीज खांबावरील वीज प्रवाह (करंट) ट्यूबवेलमध्ये उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. [ads id="ads2"] 

  सदर ही घटना शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ज्ञानेश्वरला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चार बहिणीचा एकूलता एक भाऊ शॉक लागून मृत्यू झालेला ज्ञानेश्वर हा चार बहिणींचा एकूलता एक भाऊ होता. त्याचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!