ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
शासकीय आदेशानुसार घर घर तिरंगा हर घर तिरंगा अभियान अंतर्गत दि.13/8/2022 ते 15/8/2022 पर्यंत तीन दिवस सर्व स्कूल,कॉलेज,सरकारी कार्यालय,सर्व शहरे, गांव - गल्ली बोलातील प्रत्येक घर, इमारतींवर ध्वजारोहण करण्यात येणार असुन, आज दुस-या दिवशी सर्वत्र हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.[ads id="ads1"]
यानुसार आपल्या स्वामी अकॅडमी ऐनपूर मध्ये सुद्धा आज सकाली 7:30 वा.ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या कार्यक्रमा ला प्रमुख अतिथी वाघाड़ी येथील पालक , गोवा येथील प्लॅन्टो कृषितंत्र कंपनी चे विकास अधिकारी श्री विजय पाटील , ऐनपुर येथील श्री किशोर पाटील , श्री संजय बाजोड़ तसेच स्कुलं चे प्राचार्य श्री.मनु अँटनी सर हे व्यासपीठावर उपस्थित होते. [ads id="ads2"]
आजच्या कार्यक्रमात सुरूवातिला दीप - प्रज्वलन करण्यात आले.नंतर अनिकेत महाजन सर यानी परेड पद्धतिने प्रमुख अतिथी श्री विजय पाटील याना ध्वजारोहण करण्यासाठी आमंत्रित केले व त्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर सर्व प्रमुख अतिथिंचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व मुख्य अतिथि श्री विजय पाटील यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश महाजन सर यानी व आभार मनोगत मिलिंद पाटील यांनी केले. प्राचार्य श्री.मनु अँटोनी सर, आणि सर्व शिक्षक कर्मचारी इत्यादि सर्वानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.