बलिदान केलेल्यांची स्मृती ठेवावी.... डॉ जे बी अंजने
ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला १४ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा करण्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी १४ आॅगस्ट २०२१ रोजी गॅझेट काढून आवाहन केले आहे. भारताला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते सहजसहजी मिळालेले नसून ,त्यासाठी अनेक तरुणांनी, महिलांनी, लहान मुलांनी आपल्या प्राणाची आहुति दिलेली आहे.[ads id="ads1"]
१५ ऑगस्ट ला भारत देश स्वतंत्र झाला ,परंतु त्याचे दोन तुकडे पाडण्यात इंग्रज यशस्वी झाले. १४ आॅगस्ट ला पाकिस्तान स्वतंत्र झाला. या विभाजनाच्या वेळी अनेक लोक विस्थापीत झाले,त्यावेळी जो नरसंहार झाला त्यात अनेक महिला ,पुरुष यांचा नाहक बळी गेला.रावळपिंडी, लाहोर हून प्रेतांनी खचाखच भरलेल्या ट्रेन भारतात येऊ लागल्या.[ads id="ads2"]
अनेक कुटुंबाची वाताहत झाली. अशा निष्पाप, निरागस शाहिद झालेल्या लोकांचे स्मरण १४ ऑगस्ट या दिवशी करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूयात असे विचार सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी स्वातंत्र्याच्या पूर्व दिनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. यावेळी विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.