रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) तालुक्यातील विवरे बु. व विवरे खुर्द येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विवरे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच इनुस तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.[ads id="ads1"]
तर तसेच विवरे खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.स्वरा संदीप पाटील ,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्राम पंचायत विवरे बु. येथे .श्री. ग . गो . बेंडाळे हायस्कूल येथील विध्यार्थीनींनी राष्ट्रगीत सादर केले , भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतातील जनतेला स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला.[ads id="ads2"]
संपूर्ण भारत देशात 15 ऑगस्ट राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो . 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत देशाला 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव पूर्ण झाले . इयत्ता 1 ली ते 10 वीचे विद्यार्थिनीची पुढील तिरंगारॅली घोषणा देत विवरे खुर्द येथे काढण्यात आली . विवरे खुर्द , येथील ग्राम पंचायत सरपंच . सौ , स्वरा संदिप पाटील ,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तसेच श्री ग गो बेंडाळे हायस्कूल येथील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत सादर केले.
या ठिकाण दोन्ही गावातील म्हणजेच विवरे बु. व विवरे खुर्द येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकरी ,ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका , आशावर्कर सेवीका .विवरे बु .श्री . ग गो . बेंडाळे हायस्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनी , विवरे बु. विवरे खुर्द येथील , जि.प .मराठी मुला मुलींची शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी ,व तसेच सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनी , दोन्ही गावातील विवरे बु. विवरे खुर्द येथील शिक्षक शिक्षिका . दोन्ही गावातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थनागरिक ध्वजारोहणास सलामी देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित होते.



