ऐनपूर (विजय एस अवसमल) : ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सव निमित्ताने पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केले. [ads id="ads1"]
यात २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात प्रज्ञा मनोज जाधव द्वितीय वर्ष कला हिने प्रथम क्रमांक, शिवानी अनिल चौधरी द्वितीय वर्ष विज्ञान हिने द्वितीय क्रमांक, राजेश्वरी संजय महाजन व क्ष्रेयल रविंद्र पाटील प्रथम वर्ष विज्ञान यांना विभागुन तॄतीय क्रमांक व जान्हवी योगेश महाजन हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. [ads id="ads2"]
सदर स्पर्धसाठी डॉ एस.ए. पाटील व डॉ एस. एन. वैष्णव यांनी परिक्षक म्हणून तर डॉ. जे. पी. नेहेते व हेमंत बाविस्कर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले .स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भास्कर पाटील, सचिन महाजन, ऋषिकेश महाजन, सुजित चौधरी, सौरभ पाटील, हर्षल पाटील, अनिकेत पाटील यांनी मेहनत घेतली.


