Muktaianagar तालुक्यातील अंतूर्ल येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले व शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम यांनी अंतुर्ली ग्रामपंचायतीला काही दिवसापूर्वी निवेदनाद्वारे चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी विनंती केली होती. हे निवेदन अंतुर्ली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.सुलभाताई शिरतुरे व ग्राम विकास अधिकारी श्री. अनिल वराडे यांना दिले होते. त्याची दखल घेत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक (बस-स्टँड) व ग्रामपंचायत परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. [ads id="ads1"]
याप्रसंगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक बघतांना ग्रामपंचायतचे सरपंच सौ.सुलभाताई शिरतुरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, निलेश लांडे, ग्रामविकास अधिकारी अनिल वराडे, सुपडू शिरतुरे सर,ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश पाटील, शालिक महाजन, कुलकर्णी, संजय कोळी, बाळू मेढे, मधुकर दुटटे, किरण धायले, उल्हास देशमुख, राजेंद्र शिरतुरे, अनिल वाडीले, शेख भैय्या शे. करीम उपस्थित होते.[ads id="ads2"]
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांचे आभार मानणारे पत्र श्री.अनिल वाडीले व शेख भैय्या शे.करिम यांनी गावकऱ्यांच्या वतीने दिले व आभार मानले अशीच गावाची विकास कामे सदैव होत राहो अशी आशा व्यक्त केली. ग्रामस्थांनकडुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे. टप्प्याटप्प्याने चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले.


