लंपी (lumpy) साथ रोगामुळे झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचार मंचची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (फिरोज तडवी)

कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल जावळे यांचे जळगांव जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांना निवेदन..

जळगांव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनच्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. मुख्यत्वे हा एक संसर्गजन्य रोग असून, तो प्राण्यांनमध्ये जलद गतीने पसरणारा आजार आहे.[ads id="ads1"] 

   या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागला असून त्यामुळे पशुधन पालकांना आता आपल्या झालेल्या या नुकसानाची चिंता भेडसावत असून, यासाठी शासनातर्फे पंचनामे होऊन काही आर्थिक मदत मिळावी व गुरांच्या गोठयांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांची फवारनी करणे व गुरांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे ही मागणी पशुधन पालकांमार्फत होत होती.[ads id="ads2"] 

  ज्याप्रकारे शासनामार्फत लसीकरणाच्या बाबतीत तातडीने पाऊल उचललीत त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनच्या या मागणीबाबतही तातडीने विचार करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तिच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल हरीभाऊ जावळे यांनी जिल्हाधिकारी जळगांव, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री , गिरिषभाऊ महाजन, गुलाबराव पाटील व यांना निवेदन देऊन केली आहे.यावेळी सोबत पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे, माजी अध्यक्ष जि.प.जळगांव दिलीपदादा खोडपे,पितांबरभाऊ भावसार हे उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!