अंतुर्ली येथील ज्ञानोदय_सार्वजनिक वाचनालयात बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी,अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी  निमित्त विनम्र अभिवादन करताना वाचनालयाचे अध्यक्ष एस ए भोई सर,  चंद्रकांत तायडे, दीपक शेलार, सुमित वाडीले,दूध डेरीचे संचालक भाऊराव महाजन ,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश पाटील, संचालक अनिल वाडीले, नितीन पाटील ,अंतुर्ली शहर काँग्रेसचे शे. भैय्या शे. करीम, नामदेव भोई,तायडे साहेब,ग्रंथपाल मधुकर वानखेडे, शांताराम महाजन, प्रभाकर महाजन वाचक व मान्यवर उपस्थित होते .लोकशाहीर अण्णा भाऊ साठेव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads1"] 

         याप्रसंगी वाचनालयाचे संचालक अनिल वाडीले यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी झाला  आणि एक ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले .ते एक  शिक्षक, समाज सुधारक, वकील आणि स्वातंत्रसैनिक होते. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले. त्यांना राष्ट्रवादीचे जनक देखील म्हटले जात. बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जात .त्या काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' खूप प्रसिद्ध झाला.[ads id="ads2"] 

   त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपतराय, अरविंद घोष, व्हि.वो. चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांची घनिष्ठ युती केली .शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन पटावर बोलताना सांगितले की,कादंबरी, लोकनाट्य ,नाटक ,पटकथा, लावणी, पोवाडे ,प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेली ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे . त्याचे संपूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे परंतु सगळे त्यांना अण्णाभाऊ साठे म्हणूनच ओळखत. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समाजाला जाणणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला .त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. साठे एका मांग दलित समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होती .त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतीशीलतेवर  आधारलेले होते .अण्णाभाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले आणि त्यांचे कार्य अनेक समुदाय पर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

           अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा ,कादंबरीची निर्मिती ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळवाडी , बरंबांद्याकंजारी, चिरानगरची भूत ,कृष्णकांच्या कथा हे त्यांचे काही काव्य कथासंग्रह. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या .चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी त्यानंतर 34 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यात फकीरा ,वारणेचा वाघ ,चिखलातील कमळ ,रानगंगा ,माकडाचा माळ, वैजयंत यांच्यासारख्या कादंबऱ्यांचा समावेश होता .त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार मिळाला. आभार ग्रंथपाल मधुकर वानखेडे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!