रावेर तालुक्यातील भोकरी गावाच्या जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन सख्ये भाऊ जागीच ठार झाले असून हा अपघात भोकरी गावाजवळ महामार्गावर घडला. अंकलेश्वर ते बुरहानपुर मार्गावर आज भीषण अपघात झाला असुन त्यात मजुरीचे काम करणारे दोघे सख्ये भाऊ जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.[ads id="ads2"]
खंडवा ( मध्य प्रदेश ) येथील रहीवाशी असुन कर्जोद ता. रावेर येथे कामानिमित्त राहत होते. सुनिल नारायन हरीजन (वय - 35 ) आणि अनिल नारायन हरीजन (वय 23 ) हे या भिषण अपघातात ठार - झालेल्या भावांची नावे आहे.
हेही वाचा : - यावल तालुक्यातील न्हावी गावात चक्क सट्टा बिट घेणाऱ्याचा संप ; दुकान उघडल्यास मिळणार चोप
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तर या भिषण अपघातात गरीब कुटुंबावर काळाचा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.