न्हावी गावातील सट्टा पिढी मालकांकडून सट्टा बिट घेणाऱ्यांना १०% कमिशन दिले जाते. त्यामध्ये पोलिसांनी कारवाई केल्यास त्यासाठी लागणारा खर्च मिळणाऱ्या कमिशन मधून करावा लागतो तो बिट चालकांना परवडणारा नसल्याने बिट चालकांनी २०% कमिशन वाढवून दयावे यासाठी न्हावी गावातील ३०-४० बिट चालकांनी संप पुकारला आहे. जो पर्यत कमिशन वाढवून मिळत नाही तो पर्यत गावातील एकही बिट चालक दुकान उघडणार नाही व यही बिट चालकाने दुकान उघडल्यास त्याला चोप दिला जाईल या धाकाने सर्व बिट चालक हातावर हात धरून बसले आहेत.[ads id="ads2"]
सट्टा चालकांनी कमवून दिले जात आहे लाखो रुपये......
सट्टा मालक बिट चालकांच्या भरोसे लाखो रुपये कमवित आहेत. त्याच प्रमाणे बिट घेणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यास जो खर्च लागतो तो बिट चालकांना करावा लागत. हे सर्व धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. सट्टा मालक महिन्याला पोलिसांना लाखो रुपये असल्याचे छाती ठोक बोलत आहेत.
यामुळे बिट चालकांना कमिशन वाढवून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने बिट चालकांनी संप पुकारला आहे. कदाचित प्रथमच अशा प्रकारचा संप याआधी कुठेही पुकारण्यात आलेला नसावा. सट्टा मालक मालामाल तर खेळणारे कंगाल होतांना दिसत आहे. याकडे आय जी साहेब लक्ष देणार का? असे सुज्ञ नागरिकांमधुन बोलले जात आहे.