सुवर्ण महोत्सवी शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


🔹अण्णाभाऊंचे विचार व साहीत्य ऊर्जा व प्रेरणा देणारे - पी.डी.पाटील

🔸महापुरुषांच्या विचारांवर मार्गक्रमण करा - मुख्या.जे.एस.पवार

धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे १ ऑगस्ट लोकशाहीर - साहित्यरत्न - अण्णाभाऊ साठे यांची जयंती व बाळ टिळक यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.जे. महाजन यांनी केले.[ads id="ads1"] 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व बाळ टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे यांच्या जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ देऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षक वृंदांनी शुभेच्छा दिल्या.

                यानंतर शाळेतील विद्यार्थी चेतना जावरे, कोमल भोई, चंद्रकांत जावरे, रोहित माळी, क्रांती पाटील यांनी भाषणातून दोन्ही महापुरुषांचे जीवनकार्य सांगितले. शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी अण्णाभाऊंचे साहित्य, सामाजिक शैक्षणिक कार्य विशद करून आण्णाभाऊंचे विचार हे ऊर्जा व प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.एस.पवार यांनी महापुरुषांच्या विचारांवर चला हीच खऱ्या अर्थाने महापुरुषांना आदरांजली ठरेल.

                 कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व विद्यार्थ्यांना सोनवणे मॅडम यांच्याकडुन चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.जे. महाजन तर आभार एस.एन.कोळी यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!