निंभोरा पोलीस ठाणे तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मोटरसायकल रॅली चे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त निंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत निंभोरा पोलीस ठाणे ते खिर्डी व ऐनपुर पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

सविस्तर वृत्त असे की दिनांक १५ आगस्ट१९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला आज त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.[ads id="ads1"] 

  त्या निमित्ताने आज दिनांक १४/०८/२०२२ रोजी निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हेड कॉ. ज्ञानेश्वर चौधरी पो.कॉ.स्वप्नील पाटील ,सुनील आढागळे यांनी निंभोरा पोलीस स्टेशन ते ऐनपुर मोटरसायकल रॅलीचे नियोजन केले मोटरसायकल वरून हातात राष्ट्रीय तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देत१०० ते १५० मोटरसायकल ची रॅली निंभोरा खिर्डी वरून ऐनपुर येथील बस स्टॅन्ड परिसरात धडकली.[ads id="ads2"] 

   ऐनपुर बस स्टॉप परीसरात असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश धुमाळ साहेब यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास फुलहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी पं.स.सदस्य दिपक पाटील, प्रल्हाद भाऊ बोंडे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष ,दिगंबर चौधरी तंटामुक्त अध्यक्ष निंभोरा ,प्रवीण गंभीर महाजन प्रगतीशिल शेतकरी ऐनपुर,सचिन महाले सरपंच निंभोरा ,सुनील कोंडे राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष ,प्रा. संजय मोरे, जिल्हा सचिव अनुसूचित जाती मोर्चा ,मायाताई बारी राष्ट्रवादी महिला सरचिटणीस जळगाव जिल्हा, 


किशोर पाटील ग्रा.प.सदस्य ऐनपुर अनिल जैतकर ग्रा.पं.सदस्य ऐनपूर,प्रदीपराज पंजाबी महाराज खिर्डी ,ज्ञानेश्वर महाजन, राजीव बोरसे ,नितीन अवसरमल,विजय अवसरमल, अरविंद महाजन तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस रावेर ,गणेश पाटील ग्रा.वि. अधिकारी निंभोरा ,दिलशाद शेख ग्रा.पं.सदस्य निंभोरा ,अमोल खासणे, भुवन बोरोले, मनोज सोनार, तसेच निंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पत्रकार बांधव ,सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,प्रतिष्ठित नागरिक ,होमगार्ड बांधव ,ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस मित्र ,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!