रावेर प्रतिनिधी-विनोद कोळी
के-हाळा ता,रावेर येथील उमाई फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री,दिपक गोविंदा पाटील हे दिनांक 15 आगस्ट 2022 सोमवार रोजी त्यांच्या नाय्य मागण्या संधर्भात उपोषणाला बसले असून त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.[ads id="ads1"]
भोकरी ते के-हाळा बू,या रस्त्याचे झालेल्या निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी झाली पाहिजे.तसेच,केराळा बू,ते मंगरुळ,जुनोने हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून,त्वरित नविन करणे बाबत वारिल मागण्या ह्या अतिशय महत्वाच्या असून शाळकरी विद्यार्थी तसेच शेतकरी,शेतमजुर व मंगरुळ येथे पर्यटनासाठी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी,हिताचे आहेत.[ads id="ads2"]
तरी जि ,प बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतीनिधींचे दुर्लक्ष केले जात आहे.त्यासाठी आज प्रहार संघटना अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या वतीने बांध काम विभाग अधिकारी यांना पदाधिकारी यांच्या उपस्थीत निवेदन देण्यात आले.
उपस्थीत पदाधिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,सुरेश दादा पाटील.जिल्हा युवा अध्यक्ष,अविनाश दादा पाटील.उपजिल्हा अध्यक्ष,गणेश बोरसे.तालुका अध्यक्ष,पिंटु भाऊ धांडे. तालुका युवा अध्यक्ष,योगेश निकम.शहर अध्यक्ष,मनोज वरणकर.तालुका प्रसिद्धी प्रमुख,विनोद कोळी.आणि इतर कार्यकर्ते यांची उपस्थीती त्या ठिकाणी होती.


