ऐनपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात विवीध विषयांवर गाजली ग्रामसभा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर येथे ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १८/०८/२०२२ रोजी विवीध विषयांवर ग्रामसभा घेण्यात आली.सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले या ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी ऐनपुर नगरीचे सरपंच अमोल महाजन होते.[ads id="ads1"] 

  ऐनपुर चे ग्रामविकास अधिकारी गोसावी यांनी ग्रामसभेचे विषय वाचून सांगितले व पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली पुनर्वसन टप्पा क्रमांक १ व २ मधील भुखंड संस्था किंवा खाजगी व्यक्तीला देण्यात येऊ नये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावे,म.रा.वि.वि.कं.विभागातील रिक्त पदे भरणा करणे,जिर्ण तार बदलून वेळोवेळी खंडीत होणार विज प्रवाह सुरळीत करणे, नदीच्या पुरामुळे बांधीत होणा-या शेतजमिनी संपादीत करणे, जिल्हा परिषद शाळेतील सानेगुरुजी चा जिर्ण झालेला पुतळ्याचे विसर्जन करुन लोकवर्गणीतून नविन पुतळा स्थापीत करणे,[ads id="ads2"] 

   गावातील गटारी दुरुस्ती करणे व गटारीवर ढापे टाकणे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे, गावात डास प्रतिबंधक व साथरोग प्रतिबंधक औषधे फवारणी व धुरळणी करणे, घरकुल योजनेचे अनुदान वाढवून मिळणे,सुलवाडी रस्त्यावर बसस्थानक बांधकाम करणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली व खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी, गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार,नागरीक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!