🔹पत्रकार संघातर्फे सामूहिक राष्ट्रगीताचे गायन !
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगाव : शहरातील अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वप्रथम धरणी चौकातील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय स्मारक ह्या चारही महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून माल्यार्पण व अभिवादन केले.[ads id="ads1"]
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ७५ फुटी तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन सामूहिक राष्ट्रगान गायले. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब व्ही.एस.भोलाणे, तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, शहराध्यक्ष विनोद रोकडे, ज्येष्ठ पत्रकार धर्मराज मोरे, राजेंद्र रडे, भगीरथ माळी, जितेंद्र महाजन, पी डी पाटील, हर्षल चौहान, [ads id="ads2"] आर डी महाजन, बी आर महाजन, कमलाकर पाटील, विकास पाटील, राजू बाविस्कर, दिपक पाटील, योगेश महाजन, लक्ष्मणराव पाटील, निलेश पवार, सतीश शिंदे, प्रा.मंगेश पाटील, हाजी इब्राहिम, शैलेश भाटिया, बाबुलाल बडगुजर, किरण चव्हाण, स्वप्निल भाटिया आदी पत्रकार बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


