फिरोज तडवी (यावल प्रतिनिधी ) तालुक्यातील सावखेडा सीम येथील एका अल्पवयीन मुलाने पाण्याच्या टाकीवरील झेंड्यावर जय श्रीराम असे स्टेटस करून व्हाट्सअप वर व्हायरल केल्याप्रकरणी त्याचे वर यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
सावखेडा सीम येथील पाण्याच्या टाकीवर दोन हिरवे कापडाचे झेंडे लावलेले होते त्यानंतर एक भगवा झेंडा लावण्यात आला त्या दोन हिरव्या झेंड्यांच्या व्हाट्सअप वर फोटो घेऊन त्यावर लाल रंगाने त्रास करून व त्याचे खाली जय श्रीराम असे लिहिलेले स्टेटस ठेवल्याने हा फोटो अमोल महेंद्र पाटील वय 16 याने त्याचे मालकीच्या रेडमी कंपनीच्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप स्टेटस वर व्हायरल केले म्हणून सावखेडा सिम गावातील तडवी मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्यास तो कारणीभूत झाला आहे.[ads id="ads2"]
यावरून यावल पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश मधुकर ढाकणे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून त्याचे विरुद्ध बाधवी 378/22 कलम 295 153 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फोटो गावात व्हाट्सअप वर वायरल होतात तडवी मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्याने रात्री शेकडो बांधवांनी त्याचा मोत्यांचा मोर्चा आरोपीच्या घराकडे वळविला होता तत्काळ यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानगावकर आणि फैजपूर विभागाचे पोलीस अधिकारी आपल्या ताफ्यासह तत्काळ हजर झाले आणि वातावरण निर्वाळले याबाबत गावातील दोन्ही धर्मीय हिंदू मुस्लिम तडवी यांचा सलोखा कायम राहावा म्हणून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत.


