जळगाव (फिरोज तडवी)जळगाव येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनात बौद्ध मंडळांची तसेच युवकांची भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्हास्तरीय बौद्ध मंडळांची सहविचार सभा दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी जळगाव येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रसंगी जळगाव जिल्ह्यात धम्म कार्यामध्ये तसेच आंबेडकर चळवळीमध्ये शहर तसेच गाव पातळीवर योगदान देणाऱ्या सर्व बौद्ध मंडळांच्या ( मंडळाचे नाव कोणतेही असू शकते. [ads id="ads2"]
उदा. पंचशील मंडळ, सिद्धार्थ मंडळ.......) प्रतिनिधींचा सन्मान सोहळा जळगाव येथे दुपारी 2 वा. आयोजित करण्यात आला आहे. भारतीय बौद्ध साहित्य परिषद/ बौद्ध साहित्य प्रसार संस्था या देशपातळीवरील नोंदणीकृत संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळाचे तीन प्रतिनिधी सभेला उपस्थित राहणे अपेक्षित आहे. 

