विवरे बु ता.रावेर (समाधान गाढे) सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील विवरे बु. गाव अनेक समस्यांच्या विळख्यात अग्रेसर होत आहे, फक्त एकच नाही तर अनेक समस्यांची लागण होत चालली आहे, हतबल जनता आपली व्यथा कुणाकडे मांडतील ते ही ग्रामपंचायत च्या पायऱ्या चढून त्यांची चांगलीच दमछाक झालेली आहे. [ads id="ads1"]
आणि ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर काही सेकंदात ती व्यक्ती बाहेर पाठविली जाते म्हणजे टोलवा टोलवीची उत्तरे देऊन त्यांची हकालपट्टी केली जाते, त्या बाबतीत मात्र त्यांनी PHDप्राप्त केलेली आहे असे निदर्शनास येते. त्यांच्याकडे एकच कारण ग्रामपंचायत कडे गावातील सर्वागीण विकासासाठी पैसा शिल्लक नाही आणि योजना तर जाहीर करतच नाही किंवा एखादया व्यक्तीला लाभ होईल , तसेच रस्ते, साफसफाई, पाणी योजना या तीनही गरजांचे पूर्ण बारा वाजले आहेत,15ऑगस्ट ला गावात शाळकरी मुलांची प्रभातफेरी होईल पण त्याआधी गावात आपल्या पुढार्यांनी जरा पहिली फेरी मारून बघावी जेणेकरून लहान मुलांना रस्त्याने चांगल्या घोषणा तरी देता आल्या पाहिजे किंवा चालतांना दुखापत झाली नाही पाहिजे.[ads id="ads2"]
विवरे बु.ग्रामपंचायत सदस्य ,दिपक राणे यांनी वार्ड क्रमांक तीन मधिल समस्यांची सुमारे चार महिण्यापासून ग्रामपंचायत विवरे बु चे सरपंच व ग्रामसेवक यांना धाप्या बाबत वेळोवेळी जाणिव करुन दिली असता तरी कोणत्याही प्रकारची समस्या सोडवली गेली नाही तसेच धापादुरुस्ती केला गेला नाही विवरे बु.व विवरे खुर्द या दोघ गावाला जोडला जाणारा रस्ता या रस्त्यालगत असलेल्या विवरे बु. येथिल गटारीवरील धापा फुटल्याने ये - जा - करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे.
तसेच या रस्त्यावरून दोघ गावातील छोटे मोठे वाहण ये - जा -करीत असतात हा मार्ग दोघ गावांना जोडला जातो तसेच विवरे बु. गावालगतच्या गटारी घाण कचऱ्यामुळे तुंबलेल्या असून सुध्दा ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे वाघाडी नाल्यातील डी पी जवळील हा धापा 4 महिन्या पासून फुटलेला असून या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ फार प्रमाणात असून विवरे बु .येथील सरपंच व ग्रामसेवक प्रशासन यांना कळवून सुद्धा धापा बांधणी करत नाही हा धापा मेन टर्निंग भागावर येऊन या खड्ड्यात गाड्यांचे टायर पडत असून छोटे मोठे नुकसान होत आहे तरी ग्राम पंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्या कडून या गोष्टी कडे दुर्लक्ष होत आहेत असे ग्रामपंचायत सदस्य दिपक राणे व गावातील नागरीकांचे म्हणणे आहे तसेच गावाच्या विकासासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी आवश्यक त्या बाबी लक्षात घेऊन त्या वेळो वेळी नागरीकांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे .


