सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या- जामन्या येथील अनुदानित आश्रमशाळेतील 10 वर्षीय विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रात्री झोपेत त्यास सर्पाने दंश केला होता व उपचाराकरीता त्यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Civil Hospital Jalgaon) हलवले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"]
यावल तालुक्यातील गाडऱ्या- जामन्या (Gadrya Jamnya) येथे अनुदानीत आश्रमशाळा असून या आश्रम शाळेतील आकाश जग्गा बारेला (10, जळगाव जामोद, जि. बुलढाणा) हा शिक्षण घेत होता. तो रात्री आपल्या निवासस्थानी झोपला असताना त्यास सापाने दंश केला. [ads id="ads2"]
हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस तडवी करीत आहे


