रावेर शहरातील चुनाभट्टी (Chunabhatti,Raver City) रस्त्यावरील पुलाजवळ मेंढपाळावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads2"]
सुकलाल विठ्ठल चोरमाले (27, मुंजलवाडी, ह.मु. चुनाभट्टी, सुबा शिवार. रावेर) यांना हुसेन नाजीर तडवी (कुसुंबा, ता. रावेर) यांनी कुऱ्हाडीचा दांडा मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी हुसेन तडवी यांच्याविरोधात रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश सानप हे करीत आहेत.


