बहिणाबाईंच्या काव्यातील निसर्ग प्रतिमा म्हणजे वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान- प्रा. महेंद्र सोनवणे यांचे प्रतिपादन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


          ऐनपुर प्रतिनिधी (विजय  एस. अवसरमल)     ऐनपुर येथील स. व. प. कला आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आणि बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. [ads id="ads1"] 

 यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. महेंद्र सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या जीवन कार्याचा परिचय त्यांच्या काव्याचा माध्यमातुन सखोल पणे मांडला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा ला त्यांचे नाव का? दिले गेले यामागची कारण मीमांसा त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितली. मन वढाय वढाय, लपे करमाची रेखा, कश्याले काय म्हणू नये, अरे संसार, संसार, घरोटा, मोट हकलतो एक यासारख्या अनेक कवितांमधून त्यानी भागवत संप्रदायातील तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगीतले आहे. [ads id="ads2"] 

  त्या अशिक्षित असल्या तरी त्यांचे नाव विद्यापीठाला का दिले गेले? याची कारणमीमांसा विद्यार्थ्यांच्या लक्षात प्रमुख वक्ते यांनी आणून दिली.या कायेक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ रेखा पाटील, मराठी विभाग प्रमुख या होत्या.तर सूत्र संचालन प्रा डॉ एस. एन. वैष्णव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. तायडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. एच.एम. बाविस्कर, प्रा. डॉ. नीता वाणी, प्रा. डॉ. पीरू गवळी, प्रा डॉ. रामटेके, प्रा. उमरीवाड ,प्रा. प्रदिप तायडे, प्रा. पूजा कुमावत, प्रा. डॉ.एस. ए. पाटिल हे उपस्थित होते.तसेच या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राद्यापक वृंद ही हजर होते.तर नितिन महाजन, श्रेयस पाटील, हर्षल पाटील, अनिकेत पाटील या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदरशनाखाली पार पडला. या कार्यक्रमाला 67 लोकांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!